पोलिसांनी ‘त्यांच्या’सोबत साजरी केला दिवाळी

November 4, 2013 9:09 PM1 commentViews: 23

हलीमा कुरेशी, पुणे

4 नोव्हेंबर : यंदा पुण्यात एका आगळया वेगयळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी करण्यात आली. बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांना फरासखाना पोलिस स्टेशनतर्फे दिवाळी फराळ देण्यात आला होता. पोलिस आणि रेडलाईट एरिया यांच्यात नेहमीच तणावपूर्ण संबंध असतात. अशा भागांमध्ये पोलिस आले कि घाबरुन पळापळ सुरु होते.

 

आपल्याच समाजाचा भाग असलेल्या पण कायम दुर्लक्षित असलेल्या या सेक्सवर्करना पोलिसांचा हा उपक्रम म्हणजे सुखद धक्का होता. पोलिसांकडून या सन्मानाने आलेल्या बोलावण्याने अनेकजणींना गहिवरून आलं होतं.
सेक्सवर्कर यांची दिवाळी कशी असते याच्याकडे आपण कधीच लक्ष दिल नाही. मात्र पुण्यातल्या फरासखाना पोलिसांतर्फे दिवाळी -फराळ देण्यात आला होता.तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

  • ganesh mutha

    jasa diwalicha faral dila tasech tyanchamadhe mofat shikshan v swayamrojagar hi yojana rabaun bharatiya nagarikach sanman deun samajamadhye tyana sanmanane jagun dya mhanaje bhavipidhi hi vasya vyavsayakade valanar nahi

close