सुरेश जैन अखेर तुरुंगात

November 5, 2013 2:10 PM1 commentViews: 29

Image img_237772_sureshjainjalgaon_240x180.jpgराजेश भागवत, जळगाव
5 नोव्हेंबर : सुरेश जैन यांना अखेर आज जळगावच्या तुरुंगात आपला मुक्काम हलवावाच लागला. सुरेश जैन यांना घरकुल घोटाळाप्रकरणी अटक झाली होती. अटक झाल्यापासून जैन हे तुरुंगवास टाळत होते.

 
घरकुल घोटाळ्यात अटक झाल्यानंतर सुरेश जैनना 9 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. पण आजाराच्या कारणावरून सुरेश जैन गेली दिड वर्ष मुंबईतल्या सेंट जॉर्जेस हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते.

 

कोर्टाच्या कामकाजासाठी त्यांना वारंवार जळगावच्या कोर्टात वारंवार हजर रहावं लागत, या कारणामुळं आपल्याला जळगाव तुरुंगात हलवावं असाअर्ज त्यांनी कोर्टाला केला होता. या अर्जावर 12 नोव्हेंवरला सुनावणी होणार होती. पण आज पहाटे पाचच्या सुमारास् त्यांना अँब्युलन्समधून थेट जळगावच्या तुरुंगात हलवण्यात आलं .

 

गेली 35 वर्षं जळगावच्या राजकारणावर पकड असलेल्या सुरेश जैन यांना थेट तुरुंगात जावं लागल्यानं हा त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.

  • Sandesh Bhagat

    suresh jain cha Lalu yadav .. I think politician chi swachhata mohim suru zali ahe

close