पुण्यातीले चार तरुण बेपत्ता

November 5, 2013 8:02 PM0 commentsViews: 26

missing5 नोव्हेंबर : पुण्यामध्ये एकाच कंपनीत काम करणारे चार तरूण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. एकाच कंपनीत काम करणारे प्रणव लेले, चिंतन बूच, साहिल कुरेशी हे तीन तरूण आणि श्रुतिका चंदवानी ही मुलगीचे नाव आहे.
पुण्याहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जाताना, खेड शिवापूर नाका पारकरे पर्यंत चौघांचाही घरच्यांशी संपर्क होता पण या भागातून पुढे गेल्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाहीये.

 

या चौघांचेही मोबाईल सध्या बंद आहेत. हरवलेल्या चार मुलांच्या कुटुंबियांनी याविषयी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलाय.

close