इभ्रतीपायी बापानं केली मुलीची हत्या

November 5, 2013 8:58 PM0 commentsViews: 33

honur killing copy5 नोव्हेंबर : मुंबईजवळच्या मीरारोड इथं खोट्या प्रतिष्ठेसाठी एका तरुणीचा तिच्या बापानंच अतिशय निर्घृण पद्धतीनं खून केलाय. रमेश राजबर असं या खुनी बापाचं नाव आहे. तिच्या ओढणीनं तिचा गळा दाबण्याआधी त्याच्या मित्रांनी या मुलीवर बलात्कार केला.

 

तीन दिवसांपूर्वी बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी नॅशनल पार्क शेजारी राहणार्‍यांचा तपास केला. त्यामध्ये शिवचंद्र उर्फ राजू राजबर याचा पोलिसांना संशय आला. त्यानं आपल्या मित्राला मुलीचा खून करायला मदत केल्याची कबुली पहिल्यांदा दिली.

 

गाजीपूर, सोनमपूर इथं राहणार्‍या रमेश राजबर याची 17 वर्षाची मुलगी दोन महिन्यांपूर्वी अचानक मुंबईला मीरारोड जवळच्या उत्तर इथं राहणार्‍या आपल्या प्रियकराकडे पळून आली. त्यानंतर रमेशनं आपला मित्र शिवचंद्र राजबर याची मदत घेऊन मुलीचा शोध लावला. आपली मुलगी आणि तिचा प्रियकर अनिल राजबर यांना त्यांनी एकाच गोत्रातील आहोत त्यामुळे तुम्ही लग्न करू नका हे समजावण्याचा प्रयत्न ही केला होता. पण मुलगा आणि मुलगी ऐकेनाशी झाल्यावर समाजातील आपली प्रतिष्ठा पणाला लागेल आणि आपल्या कुटुंबाला वाळीत टाकले जाईल या भीतीपोटी आणि मुलगी ऐकत नाही त्याचा राग मनात धरून मुलीला आणि त्या मुलाला चार दिवसांपूर्वी बोरीवलीतल्या नॅशनल पार्कमध्ये बोलावून घेतलं.

 

त्यानंतर त्यांनी त्या प्रियकराला मारहाण केली. मारहाणी दरम्यान प्रियकर पळून गेला. पण त्यानंतर निर्दयी बापानं आणि त्याच्या मित्रानं स्वत:च्याच मुलीवर बलात्कार केला आणि तिची गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी काशीमीरा पोलीसांनी बाप रमेश राजबर आणि त्याचा मित्र शिवचंद्र राजबर या दोन्ही आरोपींना अटक केली आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

close