कोलकत्तामध्ये साजरा होतोय ‘सचिनोत्सव’

November 6, 2013 2:52 PM0 commentsViews: 90

Image sachin-tendulkar-50th-century_300x255.jpg6 नोव्हेंबर : क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी मालिकेमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदु असलेल्या वेस्ट इंडिज विरुध्दच्या पहिल्या कसोटीला बुधवारी सुरुवात झाली.

 

आज क्रिकेटप्रेमींना सचिनच्या बॉलिंगचाही जलवा पाहिला मिळाला. सचिन तेंडुलकरने शिलिंगफोर्डला अवघ्या 5 रन्सवर आऊट करूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकीर्दीतली ही त्याची 201 वी विकेट ठरली आहे.

 

सचिन तेंडुलकरची ही १९९ वी टेस्ट असल्याने सचिनची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे सचिननेही या सामन्यात एक विकेट मिळवून फलंदाजीसोबत अद्याप गोलंदाजीतील धारही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सुरु असलेल्या या सामन्यात विंडीज फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकल्याचे दिसते. वेस्ट इंडीज 234 रन्सवर ऑल आऊट आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या तेजतर्रार मा-याने विडींजच्या चार विकेट घेतल्या आहेत.
समारोपाची मालिका अविस्मरणीय ठरावी यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने यासाठी जय्यत तयारी केली आहे. या मॅचनंतर सचिनला त्याचा मेणाचा पुतळा भेट देण्यात येणार आहे. ईडन गार्डनची देखभाल करणार्‍या माळींनी सचिनसाठी ईडन गार्डन्सची एक लहानशी प्रतिकृती तयार केली आहे.

 

सचिनला स्पेशल सलामी देण्यासाठी पॅराट्रूपर्स आणि कमांडोही तैनात करण्याची योजना आहे. क्रिकेटची पंढरी समजला जाणा-या ईडन गार्डनवर अवतरलेल्या क्रिकेटच्या देवाचे दर्शन घेण्यालाठी ईडन गार्डन स्टेडियमच्या आत व बाहेर  जनसागर लोटला आहे. विशेष म्हणजे ही मॅच पाहण्यासाठी सचिन तेंडुलचरची पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर हे ही ईडन गार्डनवर उपस्थित आहेत.

close