पुण्यातील चार बेपत्ता तरुणांपैकी एकाचा मृतदेह सापडला

November 6, 2013 3:04 PM0 commentsViews: 19

punemissing6 नोव्हेंबर : पुण्यातील चार बेपत्ता झालेल्या तरुणां प्रकरणाने एक धक्कादायक वळण घेतले आहे.  बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी चिंतन बूच या तरूणाचा मृतदेह शिरवळ तालुक्यात जवळच्या नीरा नदीत सापडला आसुन बाकीच्यांचा तपास आजुनही सुरू आहे.

 

 

प्रणव लेले, चिंतन बूच, साहिल कुरेशी आणि श्रुतिका चंदवानी हे चौघेही तरूण एकाच कंपनीत काम करत होते. 1 नोव्हेंबरला पुण्याहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जाणार होते. मात्र शुक्रवार रात्रीपासून त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा मोबाईलही स्वीच ऑफ ेच होता. अखेरीस त्यांच्या कुटुंबीयांनी कोथरुड पोलिसांकडे मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार  दाखल केली. उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक अथक मेहनत घेत आहेत.

close