नरेंद्र मोदींना पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षा देण्यात यावी- भाजप

November 6, 2013 7:29 PM1 commentViews: 19

Image modi345234_300x255.jpg6 नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या संसदीय समितीने बुधवारी केंद्र सरकारकडे केली आहे .

 

पाटण्यातील मोदींच्या सभे पुर्वी सहा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. लष्कर-ए -तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानमधल्या खलिस्तानी दहशतवाद्यांना हाताशी धरूननरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. एनआयए आणि बिहार पोलीस या स्फोटांचा तपास करत आहेत.

 

या हल्ल्यानंतर मोदी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, मोदींना पंतप्रधानांइतकी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारा ठराव भाजपच्या संसदीय मंडळाने बुधवारी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधानांना असलेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा नियमांनुसार मोदींना मिळू शकत नाही आणि त्यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • Manaci Joshi

    Kahi pan magni kartat he BJP vale…asa konala pan Pantpradhanansarkhi SECURITY dyeyla lagle tar mag baghayla nako..

close