एलकुंचवार यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान

November 6, 2013 9:50 PM0 commentsViews: 45

6 नोव्हेंबर:  यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना देण्यात आला आहे. रंगभूमी दिनाच्या निमित्तानं काल सांगलीमध्ये भावे नाट्यगृहात झालेल्या एका दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार एलकुंचवार यांना देण्यात आला. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन आगाशे यांच्या हस्ते हा पुरस्कार एलकुंचवार यांना देण्यात आला.

 

शाल , श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यावेळी सांगलीसह राज्यातले नाट्यक्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते. दरम्यान सत्काराला उत्तर देताना एलकुंचवार यांनी नाटकाच्या परंपरांवर भाष्य करत सामाजिक चौकट बदलताना नाटकंही बदलतील असं म्हटलं तर अध्यक्षीय भाषणात आगाशे यांनी अनेक जण फायद्यासाठीच नाटकं करत असल्याची मार्मीक टीकाही केली.

close