मुस्लिमप्रेमावरून सेनेचा भाजला चिंमटा

November 6, 2013 2:09 PM0 commentsViews: 2

6 नोव्हेंबर: सामना या दैनिकात परत एकदा नाव न घेता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

 

सगळ्यांनाच निधर्मी व्हायची घाई झाली आहे आणि मुसलमानांचे तारणहार म्हणून डंका पिटायचा आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांच नाव न घेता करण्यात आला आहे.

 
मुसलमानांचे लांगुलचालन हा देशाला लागलेला शाप आहे असं म्हणत राममंदिर, समान नागरी कायद्यासारखे विषयही बाजूला ठेवले जातात व जाहीर सभांमधून बुरखेवाल्यामहिलांची उपस्थिती दिसावी यासाठी खास प्रयत्न केले जातात, अशी बोचरी टिका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

close