केंद्रातील सरकार कोळश्याच्या मागे – मोदी

November 7, 2013 3:26 PM0 commentsViews: 18

gujrat narendra modi 7 नोव्हेंबर : काँग्रेसच्या मॅ़डम म्हणतात, आम्ही शांतपणे काम करतो. म्हणूनच केंद्रात विविध घोटाळे होत असतानाच सोनिया गांधी गप्प का बसल्या आहेत या घोटाळ्यावर त्या भाष्य का करत नाही असे सांगत नरेंद्र मोदींनी गुरुवारी थेट सोनिया गांधीना लक्ष्य केले.

 
छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगदलपूर आणि  येथे नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते. या सभेत मोदींनी काँग्रेस आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांवर लक्ष्य केले. काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, काँग्रेसने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासनं दिली होती. मात्र ती आश्वासन पूर्ण करण्याचा त्यांना विसर पडला आहे. काँग्रेसचे युवराज म्हणतात, गरिबी ही एक मानसिक अवस्था आहे. भूकेलेपोटी झोपणे, डोक्यावर छप्पर नसणे ही मानसिक अवस्था कशी असू शकते असा सवाल उपस्थित करत काँग्रेसच्या युवराजांनी गरिबांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे मोदींनी सांगितले.

 
छत्तीसगढमधील भाजपचे नेते व मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या कार्याचे मोदींनी कौतुक केले. छत्तीसगढ राज्यात गरिब व आदिवासी जनतेच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवण्यात आल्या. या योजनांमुळे राज्याचा विकास होतोय. रमणसिंग यांच्या कामाच्या धडाक्यामुळे येत्या काही वर्षात छत्तीसगढ गुजरातपेक्षा पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छत्तीसगढ प्रगती करत असतानाच उत्तराखंड आणि झारखंड या राज्यांची अधोगती होतेय. कारण त्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे ज्याचा पंजा मात्र कोळश्याच्या काळ्या रंगात रंगले आहेत असा आरोपही त्यांनी केला.

 
परदेशात गुंतवलेला काळा पैसा भारतात परत आणल्यास देशाचा विकास करता येईल. गरिबी दूर करण्यासह देशाच्या विविध राज्यांमध्ये रेल्वे रुळ टाकून वाहतूक व्यवस्था सक्षम करता येईल. भाजप सत्तेत आल्यास परदेशातील काळा पैसा पुन्हा भारतात आणू असे आश्वासनही त्यांनी दिले.

 

 

close