पुणे- बेपत्ता तरुणांचे मृतदेह नीरा नदीत सापडले

November 7, 2013 3:21 PM0 commentsViews: 46

 7 नोव्हेंबर :पुण्यातील चार तरुण बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा गुंता अखेर सुटला आहे. या सर्व तरुणांचे मृतदेह व त्यांची गाडी नीरा नदीच्या पात्रात आढळले असून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्यातील चिंतन बुच, प्रणव लेले, साहिल कुरेशी व श्रुतिका चंदवाणी हे चार तरुण १ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या सुट्टीत मौजमजा करण्यासाठी गोव्याला जायला निघाले होते. आय २० गाडीतून हे चौघे निघाले होते. मात्र शुक्रवारी रात्रीपासून त्यांचाशी काहीच संपर्क होत नव्हता. चौघांचे मोबाईळ नॉट रिचेबल येत असल्याने तरुणांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मुलं बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

बुधवारी यातील चिंतनचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रात आढळला होता. यानंतर पोलिसांनी अन्य सरकारी यंत्रणांच्या मदतीने नीरा नदीच्या पात्रात शोधमोहीमच हाती घेतली. गुरुवारी दुपारी हे चौघे ज्या गाडीतून निघाले होते ती गाडी नदीपात्रात आढळली.
गाडीत उर्वरित तिघांचेही मृतदेह आढळले. या तिघांनीही सीट बॅल्ट लावले होते.
त्यामुळे गाडी नदीत पडल्यावर त्यांना गाडीतून बाहेर पडणे शक्य झाले नाही व पाण्यात बुडून त्या सर्वांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
close