बोगस कागदपत्रांच्या गुन्ह्यात रेल्वेच्या इंजिनियरला अटक

November 7, 2013 2:00 PM0 commentsViews: 17
bogas7 नोव्हेंबर : बोगस कागदपत्राच्या आधारे रेल्वे भरती करणा-या रेलेच्या इंजिनियरला आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. या दोघांना कोर्टाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून या दोघांनी भरतीसाठी अनेकांना बोगस कागदपत्र तयार करुन दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
२००६ मध्ये रेल्वे वर्कशॉपमध्ये शिकाऊ पदासाठी भरती झाली होती. यासाठी अर्जदार आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. माज्ञ सेक्शन इंजिनियर यासिन शेख यांनी त्यांचा मुलगा अखिल शेख याच्या भरतीसाठी बोगस कागदपत्र तयार करुन घेतली. शेखचा आयटीआय उत्तीर्ण असल्याचा दाखला, ओबीसी जातीचा दाखला, वयाचा दाखला म्हणून दिलेले शाळा सोडल्याचा दाखला ही कागदपत्र भरतीच्या वेळी सादर करण्यात आली होती. मात्र कय्युम सिद्दीकी यांना या प्रकारावर संशय आल्याने त्यांनी आरटीआय अंतर्गत या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिली. यानंतर ही सर्व कागदपत्र बोगस असल्याचे उघडकीस झाले.
याप्रकरणी कय्युम यांनी ना.म.जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली  असून याप्रकरणी पोलिसांना दोघा पितापुत्रांना अटक केली. अनेक आयटीआय नापासांना बोगस कागदपत्रांच्या आधारे भरती करण्यात आल्याचा संशय कय्युम सिद्दीकी यांनी व्यक्त केला असून 2006 साली  झालेल्या भरती प्रक्रियेची नव्याने चौकशी व्हावी, अशी मागणी सिद्दीकी यांनी केली आहे.

 

close