नाशिकमध्ये भोंदूबाबा मोकाट

November 7, 2013 7:17 PM0 commentsViews: 22

7 नोव्हेंबर : अध्यात्माच्या नावानं भक्तांना फसवणारा दिलीपपुरी देवधरपुरी बाबा ऊर्फ हरीओम बाबा हा सध्या मोकाट फिरतोय. आर्थिक गैरव्यवहार आणि लैंगिक शोषण करण्याच्या तक्रारी नंतर नाशिक कोर्टानं या भोंदूबाबाच्या नावे अटक वॉरंट जारी केल आहे पण अजूनही नाशिक ग्रामीण पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आलं नाहीये.

 

 

या भोंदूबाबाच मूळ नाव दिलीप जमुनाप्रसाद तिवारी आहे. आतापर्यंत याच्या नावानं यवतमाळ, सिंदखेडराजा, बुलढाणा आणि आता नाशिक जिल्ह्यातील देवळा अशा वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे. आश्रम काढायचा, गुप्तधनाची अभिलाषा दाखवायची, मूल होण्यासाठी मंत्राचा थोतांड रचायचा अशा या भोंदूबाबाच्या कारवायांद्वारे त्याने आतापर्यंत अनेक भक्तांना लाखो रुपयांनी चखमा दिला आणि इतकच नाही तर महिलांचं लैंगिक शोषणचा ही आरोप या भोंदूबाबांवर लावला आहे.

 

 

विशेष म्हणजे स्थानिक पोलिसही याविरोधात काहीही कारवाई करण्याऐवजी बाबालाच पाठीशी घालण्याचा प्रसत्न करत असल्याचा आरोप होतोय.

close