सीबीआयला तपासाचे अधिकार नाहीत – गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय

November 8, 2013 3:53 PM0 commentsViews: 20

8  नोव्हेंबर : केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ला गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार नाहीत तसंच सीबीआय आरोपींना अटकही करू शकत नाही, असा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयानं दिला.  केंद्र सरकार आता गुवाहाटी उच्च न्यायालयच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे.

 

केंद्रीय गृहमंत्रालयानं एप्रिल १९६३ रोजी सीबीआयची स्थापना केली. सीबीआय ही केंद्रीय तपास यंत्रणा दिल्ली पोलीस विशेष स्थापना कायद्याच्या अंतर्गत येणारं पोलीस दल नाही. म्हणूनच सीबीआयच्या सर्व कारवाया घटनाबाह्य ठरतात, असं कोर्टानं म्हटलंय.

 

संसदेला आता सीबीआयची नव्यानं स्थापना करावी लागेल आणि त्यासाठी नव्यानं कायदा करावा लागेल असंही उच्च न्यायालयचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारपुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

सीबीआय या तपास यंत्रणेच्या स्थापनेचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णयाच्या प्रस्तावाला राष्ट्रपतींसमोर मंजुरीसाठी ठेवण्यातच आला नाही. यामुळं हा आदेशच बेकायदेशीर ठरतो असं गुवाहाटी उच्च न्यायालयानं म्हटलय.

close