भारताचा दणदणीत विजय

November 8, 2013 5:18 PM0 commentsViews: 146

newmatch 8  नोव्हेंबर : कोलकाता टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळला आहे. मॅचच्या तिसर्‍याच दिवशी भारतानं वेस्ट इंडिजचा 1 इनिंग आणि 51 रन्सनं पराभव केला आहे. कोलकाता टेस्ट जिंकत भारताने आपली अखेरची टेस्ट सीरिज खेळणार्‍या सचिन तेंडुलकरला विजयाची खरी भेट दिलीये. रोहित शर्मा आणि आर अश्विनची सेंच्युरी आणि मोहम्मद शमीच्या भेदक बॉलिंगच्या जोरावर भारताने या मॅचच्या तिसर्‍याच दिवशी विजयावर शिक्कामोर्तब केला.

 

 

भारताने पहिल्या इनिंगमध्ये 453 रन्स करत 219 रन्सची आघाडी घेतली होती पण दुसर्‍या इनिंगमध्येही वेस्ट इंडिजची इनिंग कोसळली. भुवनेश्‍वर कुमारनं ख्रिस गेलची विकेट घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं तर आर अश्विननं पॉवेल आणि डॅरेन ब्राव्होची विकेट घेत विंडीजला धक्का दिला. यानंतर फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीनं 5 विकेट घेत विंडीजच्या इनिंगला फुलस्टॉप लावला. त्याआधी आज सकाळी पहिल्या सत्रात भारताची पहिली इनिंग 453 रन्सवर ऑलआऊट झाली. आर अश्विननं 124 रन्स केले, तर रोहित शर्मा 177 रन्स करुन आऊट झाला.
कोलकाता टेस्टच्या तिसर्‍या दिवशी सचिन तेंडुलकर बॅटिंगसाठी मैदानात उतरला नाही, पण सचिनच्या नावाची जादू कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर कायम होती. सचिन फिल्डिंगसाठी मैदानात आल्यावर त्याची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी बाऊंड्रीबाहेर गर्दी केली होती. सचिनचे फोटो काढण्यासाठी कॅमेरे, मोबाईल क्लिक होत होते. तर स्टेडिअममध्ये सचिनचे मुखवटे घातलेले अनेक प्रेक्षक सचिनच्या नावाचा जयघोष करत होते. मॅचच्या दरम्यान सचिनचे फोटोचे फुगेही सचिनच्याच हस्ते आकाशात सोडण्यात आले. यावेळी क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला, सचिन… सचिन…!

 

 

close