राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना डी.लीट पदवी बहाल

February 7, 2009 3:58 PM0 commentsViews: 103

7 फेब्रुवारी मुंबईराष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मुंबईतल्या एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ऑफ लेटर म्हणजेच डी.लीट पदवी बहाल करण्यात आली. विद्यापीठाच्या 58 व्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल एस सी जमीर यांच्या हस्ते ही पदवी देण्यात आली. दीक्षांत समारंभात प्रतिभाताईंच्या हस्ते विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पदव्या देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, उच्चशिक्षणमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री सुरेश शेट्टी आणि डॉ. देवीसिंग शेखावत उपस्थित होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी या पहिल्या महिला विद्यापीठातर्फे भारताच्या पहिला महिला राष्ट्रपतीं म्हणून पाटील यांना ही पदवी देण्यात आली.

close