सपा, बसपवर मोदींचा हल्लाबोल, पण ममता दिदींकडे मैत्रीचा हात

November 8, 2013 4:12 PM0 commentsViews: 17

imagesउत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांच्यात केवळ गुन्हेगार राजकारणी आणि संपत्तीची स्पर्धा असून या स्पर्धेमुळे उत्तरप्रदेशमधील जनतेच्या हिताकडे त्`यांनी दुर्लक्ष केले. या दोन्ही पक्षाच्या नाकर्तेपणामुळे उत्तरप्रदेशची अधोगती झाली असून केंद्रातील काँग्रेस सरकारमुळे देशाचीही हीच अवस्था झाल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी तिन्ही पक्षांवर जोरदार टीका केली.

 

 

मात्र दुसरीकडे मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे कौतुक करत तृणमूल काँग्रेसकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले, यंदा सत्ता जाणार असल्याचे लक्षात आल्याने काँग्रेस भाजपला विरोध दर्शवत आह. लोकशाहीमध्ये हिंसेला स्थान नसते मात्र काँग्रेस आमच्या मागून हल्ला करत आहे.

 

 

उत्तरप्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहेत. या राज्यातील गरिबी दूर झाल्यास संपूर्ण देशाचे चित्र बदलू शकते. मात्र काँग्रेस, बसपा आणि सपामुळे उत्तरप्रदेशची पिछेहाट झाली. याउलट बिमारु राज्य असलेले मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकारने विकासकामांचा धडाका लावून राज्याला प्रगतीच्या दिशेने नेले. बसपा आणि सपा सीबीआयपासून सुटका मिळावी यासाठी केद्र सरकारला मदत करते. पण या मोबदल्यात ते राज्याच्या विकासासाठी केंद्राकडून काहीच मागत नाही अशी टीका त्यांनी केली.

close