गोल्डमन सॅक्सवर वाणिज्यमंत्रींची टीका

November 8, 2013 9:37 PM0 commentsViews: 11

8  नोव्हेंबर : पुढच्या सार्वत्रिक निवडणुका NDA जिंकू शकते असं म्हणणार्‍या गोल्डमन सॅक्स या गुंतवणूक कंपनीवर वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी टीका केलीय. भारतात सत्ता पालट झाला, तर गुंतवणूकदार त्यासाठी सकारात्मक असतील असं मत ‘इंडिया – फ्रॉम अंडर टू मार्केट वेट’ या रिपोर्टमध्ये गोल्डमन सॅक्सने म्हटलंय.

यावर गोल्डमन सॅक्स भारताच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करत असल्याचं आनंद शर्मा यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. गोल्डमन सॅक्सने मोदींना असा पाठिंबा देण्यावरून त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल किती कमी माहित हे उघड होत असल्याचं आनंद शर्मांनी म्हटलंय.

पण स्टॅण्डर्ड ऍण्ड पुअर या रेटिंग एजन्सीने तर याहीपुढे जात 2014 निवडणुकांनंतर भारताचं रेटिंग घसरण्याचा इशारा दिलाय. सत्तेवर येणार्‍या सरकारने बदलांकडे लक्ष दिलं नाही तर रेटिंग खाली घसरू शकतं असंही त्यांनी म्हटलं आहे. युपीए3 किंवा तिसर्‍या आघाडीच्या जुळवाजुळवीच्या दिशेने हा इशारा होता.

close