बनवारीलाल पुरोहित पुन्हा भाजपमध्ये

February 7, 2009 6:10 PM0 commentsViews: 4

6 फेब्रुवारी, नागपूर नागपूरमध्ये भरलेल्या भाजपच्या अधिवेशनात माजी नेत्यांनी पुन्हा एकदा पक्षाची कास धरलीये. त्याचचं उदाहरण म्हणजे नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. पुरोहित यांच्यासोबत यवतमाळचे माजी खासदार राजाभाऊ ठाकरे आणि वर्धा इथले माजी खासदार विजय मुडे यांनी सुद्धा प्रवेश केला. पुरोहित यांना नागपूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलंय. 1998 मध्ये पुरोहित यांनी भाजपला रामराम ठोकला होता. तत्कालिन भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावर कोळसाखाण प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला. त्यामुळं पुरोहित यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांनी महाजनांसोबत गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यावर ही त्यांनी आरोप केले होते. पण आता झालं गेलं विसरुन पुरोहित भाजपमध्ये पुन्हा दाखल झालेत.

close