CBI साठी केंद्राची सुप्रीम कोर्टात धाव

November 9, 2013 3:21 PM0 commentsViews: 14

Image img_237182_suprimcoartoncbi_240x180.jpg09 नोव्हेंबर : गुवाहाटी हायकोर्टाच्या निर्णयामुळे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. गुवाहाटी कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती द्या अशी मागणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.केंद्र सरकारने यासंदर्भात याचिकाही दाखल केली आहे.

सीबीआयला गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार नाहीत तसंच सीबीआय आरोपींना अटकही करू शकत नाही, असा निर्णय गुवाहाटी हायकोर्टाने दिला आहे. याबाबतच केंद्र सरकारनं गुवाहाटी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.

आता माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यासह टू जी घोटाळ्यातले आरोपी खटल्यावर स्थगितीची मागणी करत आहे.  शाहीद बलवा यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात शुक्रवारी याचिका दाखल केलीय. आणि गुवाहाटी हायकोर्टाच्या आदेशाचा आधार देत 2जी चा खटला ताबडतोब थांबवला जावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केलीय. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी शुक्रवारी यासंदर्भात पंतप्रधान मनमोहन आणि कायदामंत्री कपील सिब्बल यांची भेट घेतली आणि चर्चा केली.

close