जादुटोणाविरोधी कायदा करा अन्यथा बेमुदत उपोषण

November 9, 2013 1:16 PM0 commentsViews: 24

Image img_225372_jadutoanaact_240x180.jpg09 ऑक्टोबर : जादुटोणा विरोधी विधेयकाचं सरकारनं आगामी हिवाळी अधिवेशनात कायद्यात रूपांतर करावं अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केलीय. या वटहुकूमाचं कायद्यात रूपांतर करू असं आश्वासन सरकारनं दिलं होतं.

मात्र हे आश्वासन न पाळल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिलाय. ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

या मागणीसाठी 14 नोव्हेंबरपासून राज्यभर जादुटोणाविरोधी कायद्याच्या मंजुरीसाठी निर्धार मोहीम राबवण्यात येणार आहे. येत्या 9 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

close