राज संतापले, मनचिसेची पुनर्रचना करण्याचे दिले आदेश

November 9, 2013 2:26 PM2 commentsViews: 64

raj arrest warant09 ऑक्टोबर : राज कुंद्रा यांच्याव सेटवर तोडफोड प्रकरणानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता चांगलेच भडकले आहे. राज ठाकरे यांनी आपली महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सध्याच्या कार्यकारिणीतल्या अनेक दिग्गजांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी मनचिसेच्या विलास सुद्रीक या कार्यकर्त्याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचललं असल्याची जबानी सुद्रीक यांनी दिंडोशी पोलिसांसमोर दिलीय. काही दिवसांपुर्वी राज कुंद्रा यांच्या सेटवर जाऊन तोडफोड करणार्‍या मनचिसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्रीक हेही होते.

त्यानंतर पोलिसांनी अटक केल्यानंतर पदाधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मदत न मिळाल्याने सुद्रीक यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं त्याने स्वत: पोलिसांना सांगितलंय. या प्रकारामुळे राज ठाकरे संतापले असून त्यांनी मनचिसेची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले आहे.

  • amruta mane

    राज साहेब पक्ष चालवायला मावळे लागतात ते तुमच्या कडे नाही

  • Pradeep Korgaonkar

    साहेब जरा स्वता लक्ष्य द्या

close