पंतप्रधानांचा कोलंबो दौरा रद्द ?

November 9, 2013 3:04 PM0 commentsViews: 20

Image img_237082_pm23423523_240x180.jpg09 नोव्हेंबर : पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा कोलंबो दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. कोलंबोतल्या कॉमनवेल्थ प्रमुखांच्या बैठकीसाठी पंतप्रधान जाणार नाहीत अशी माहिती केंद्रातल्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे.

याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. याबाबतचा औपचारिक निर्णय लवकरच श्रीलंका सरकारला कळवला जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधानांऐवजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद कोलंबोला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी युगांडा आणि त्रिनिदाद इथं झालेल्या कॉमनवेल्थ प्रमुखांच्या बैठकांना मनमोहन सिंग यांनी हजेरी लावली होती.

close