महिला बचत गटांना 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळणार

February 7, 2009 6:12 PM0 commentsViews: 18

6 फेब्रुवारी , सातारा महिला बचत गटातल्या महिलांचा विमा उतरला गेला पाहिजे आणि यासाठी सर्व मदत करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. शिवाय या मार्च महिन्यापर्यंत महिला बचत गटांना चार टक्के व्याजदरानं कर्ज देण्याचं आश्वासनही पवारांनी यावेळी दिलं. सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर महिला बचत गटांना केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण करण्यात आलं. यावेळी 40 हजार महिलांची उपस्थिती होती.

close