CBI बाबतच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

November 9, 2013 6:29 PM0 commentsViews: 20

Image suprim_cort_on_cbi4_300x255.jpg09 नोव्हेंबर : सीबीआय बाबतच्या गुवाहाटी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. पुढची सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे. सीबीआयला गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार नाहीत तसंच सीबीआय आरोपींना अटकही करू शकत नाही, असा निर्णय गुवाहाटी हायकोर्टाने दिला होता.

याबाबतच केंद्र सरकारने गुवाहाटी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. याबाबत केंद्र सराकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आज यावर सुनावणी झाली. गुवाहाटी कोर्टाच्या निर्णयामुळे माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यासह टू जी घोटाळ्यातले आरोपी खटल्याच्या स्थगितीची मागणी करत आहे.

शाहीद बलवा यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात काल याबाबत याचिका दाखल केलीय. आणि गुवाहाटी हायकोर्टाच्या आदेशाचा आधार घेत 2जी खटला ताबडतोब थांबवला जावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केलीय. मात्र सुप्रीम कोर्टाने निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे सर्व मागण्यावर तुर्तास पडदा पडलाय.

close