हा मार्ग धोक्याचा – ठाणे रेल्वे स्टेशन बनलंय समस्यांचं जाळं

February 7, 2009 6:16 PM0 commentsViews: 144

6 फेब्रुवारी, ठाणे संदीप पवार / आशिष जाधवठाणे रेल्वे स्टेशनवरून दररोज किमान पाच लाख प्रवासी ये-जा करतात. पण त्यामानानं या महत्त्वाच्या स्थानकावर प्रवाशांसाठी पुरेशा सोयी सुविधा नाहीत. उलट ठाणे रेल्वे स्टेशन हे आज एकप्रकारे समस्यांचं, गैरव्यवस्थेचं जाळं बनलंय. मध्यरेल्वे आणि हार्बरच्या लोकल गाड्यांबरोबरच एक्सप्रेस गाड्या ठाणे रेल्वे स्टेशनवरून सुटतात. प्रवाशांबरोबरच गाड्यांची आणि पर्यायानं प्लॅटफॉर्म्सची संख्याही वाढलीय. पण प्रवाशांची होणारी गैरसोय मात्र कायम आहे. या स्टेशनवर दहा प्लॅटफॉर्म आहेत. पण फुटओव्हर ब्रीज मात्र दोनच आहेत. त्यामुळं ऐन गर्दीच्या वेळी मात्र प्रवाशांचे हाल होतात. आणखी एक फुटओव्हर ब्रीज बांधायला रेल्वे टाळाटाळ करतेय. त्यासाठी मात्र सॅटीस प्रकल्पाचं कारण पुढं केलं जातंय. रखडलेल्या सॅटीस प्रकल्पामुळं स्थानकाबाहेरच्या वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालाय. स्थानकावर प्रवाशांना ये जा करण्यासाठी 11 मार्ग आहेत. पण त्यामुळं प्रवाशांची सुरक्षितताच अधिक धोक्यात आलीय.

close