मेट्रो धावली घाटकोपरपर्यंत !

November 9, 2013 9:15 PM0 commentsViews: 28

09 नोव्हेंबर : मुंबईचा महत्वाकांक्षी बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली. वर्सोवा ते घाटकोपर अशी ही पहिली चाचणी आज घेण्यात आली. वर्सोवा ते घाटकोपर या 11.04 किलोमिटर अशा अप आणि डाऊन मार्गावर ही चाचणी घेण्यात आलीय. या चाचणीच्या वेळी गाडीचा वेग ताशी 20 किलोमिटर इतका ठेवण्यात आला होता. ही चाचणी उद्यापासून नियमित घेतली जाणार आहे. मुंबईकरांना या मेट्रो रेल्वेनं प्रवास करण्याची उत्सुकता लागून राहिलीय. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. सप्टेंबर 2013ची डेडलाईन मेट्रोला देण्यात आली होती मात्र संपूर्ण चाचणीच्या नंतरच मेट्रो ट्रॅकवर धावणार असल्याचं एमएमआरडीएने स्पष्ट केलं. आता उद्यापासून मेट्रो ट्रॅकवर आली असून लवकरच ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मेट्रो रेल्वेची वैशिष्ट्यं

1) मार्च 2008 साली सुरू झालेला हा प्रकल्प 2012 साली पूर्ण करण्याचं टार्गेट होतं. पण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न न सुटल्यामुळे या प्रकल्पाला 1 वर्षाचा उशीर झाला. 2) मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्यात वर्साेवा ते घाटकोपर हा 12 किलोमीटरचा मार्ग असणार आहे.3) या मार्गावर प्रत्येक किलोमीटरला एक स्टेशन असणार आहे. म्हणजेच एकूण 12 रेल्वे स्टेशन असणार आहेत.4) पहिल्या टप्यातील हा मेट्रो रेल्वेचा मार्ग संपूर्णपणे एलिव्हिेटीड असणार आहे.5) या पहिल्या प्रकल्पाला 2,356 कोटी रुपये खर्च आला.6) प्रवाश्यांसाठी खुष खबर म्हणजे ही मेट्रो रेल्वे संपूर्ण वातानुकुलीत असणार आहे.7) या मेट्रो रेल्वेच्या प्रवासाचे दर देखिल 8 रुपयांपासून ते 15 रुपयांपर्यंत असणार आहे.

close