ईडनवर सचिनला निरोप

November 9, 2013 9:47 PM0 commentsViews: 156


कोलकाता टेस्टच्या तिसर्‍या दिवशी सचिन तेंडुलकर बॅटिंगसाठी मैदानात उतरला नाही, पण सचिनच्या नावाची जादू कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर कायम होती. सचिन फिल्डिंगसाठी मैदानात आल्यावर त्याची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी बाऊंड्रीबाहेर गर्दी केली होती. सचिनचे फोटो काढण्यासाठी कॅमेरे, मोबाईल क्लिक होत होते. तर स्टेडिअममध्ये सचिनचे मुखवटे घातलेले अनेक प्रेक्षक सचिनच्या नावाचा जयघोष करत होते. मॅचच्या दरम्यान सचिनचे फोटोचे फुगेही सचिनच्याच हस्ते आकाशात सोडण्यात आले. यावेळी क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला, सचिन… सचिन…!

close