‘हैयान’चा तडाखा,10 हजार लोकांचा बळी

November 10, 2013 3:46 PM0 commentsViews: 52

typhoon210 नोव्हेंबर : फिलीपाईन्समध्ये धडकलेलं आत्तापर्यंतंचे सर्वात शक्तीशाली वादळ म्हणून ओळखल्या जाणा-या हैयाने या चक्रीवादळाच्या तडाख्यात सुमारे १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. या वादळात आत्तापर्यंत सुमारे साडे तीन लाख लोकांना सुरक्षितस्थळी न्यावे लागले आहे.

 

शुक्रवारी फिलीपाईन्समध्ये धडकलेल्या चक्रीवादळामुळे  सुरुवातीला २३५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहिले असुन नंतर वादळाची तीव्रता वाढू लागली आहे . चक्रीवादळाच्या तांडवामुळे वादळ्याच्या पट्ट्यात येणारी घर, दळणवळण यंत्रणा संपुर्णपणे उद्धवस्त झाले होते.

 
या वादळाचा  ४० लाख लोकांना  फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. चक्रीवादळ येण्यापूर्वी सरकारने हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं, पण हे प्रयत्न अपुरे पडल्याचे दिसून येत आहे.

close