महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव

November 10, 2013 3:05 PM0 commentsViews: 32

10  नोव्हेंबर : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाला सुरवात झाली आहे. काल पहिल्याच दिवशी सूर्य किरणांनी देवीच्या गाभार्‍यात प्रवेश केला. संध्याकाळी पावणेसहा वाजता झालेला हा किरणोत्सव अनुभवण्यासाठी गर्दी केली. पुढचे दोन दिवस किरणोत्सव चालणार असून स्वच्छ सूर्य प्रकाश असला तर सूर्य किरणं देवीच्या मुखवट्यापर्यंत पोहोचतात. वर्षातून दोन वेळा अशी किरण गाभार्‍यात प्रवेश करतात. निसर्गाचा हा अनोखा अविष्कार असल्याचं मानलं जातं आहे.

close