शेतमालाला चांगला दर हवा – पवार

November 10, 2013 8:25 PM0 commentsViews: 25

10  नोव्हेंबर : मराठवाड्यातील पहिला टेक्सटाईल्स पार्क म्हणुन नावारुपास आलेल्या वसमत येथील पुर्णा ग्लोबल टेक्सटाईल्स पार्कचा उद्घाटन सोहळा केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास वस्त्रोद्योगमंत्री डॉ.के.एस.राव उपस्थित होते.भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क योजनेंतर्गत वसमत इथ पूर्णा ग्लोबल टेक्सटाईल्स पार्क उभा राहिला. पार्क सुसज्ज यंत्रसामुग्रीसह उत्पादनासही सुरुवात झालीय.

 

यावेळी भाषणात सांगितले की शेतकर्‍यांच्या मालाला किंमत दिली तर काही लोक म्हणतात महागाई वाढली पण खताच्या,मजुरांच्या किमती झाल्या याचा कोणीच विचार करत नाही.शेतकर्‍यांच्या मालाला किंमत दिली की महागाई वाढली असे म्हणतात पण नाही कारण देशातील 70 टक्के जनता शेती करते आणि त्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे अस मत शरद पवारांनी व्यक्त केल.

close