कौल छत्तीसगढचा

November 11, 2013 11:29 AM0 commentsViews: 18

votting  11  नोव्हेंबर : छत्तीसगढ विधानसभेसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सोमवारी सुरुवात झाली. ९० जागा असलेल्या छत्तीसगढ विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १८ जागांवत मतदान घेण्यात येईल. मात्र या मतदार संघांमध्ये नक्षलवाद्यांचे सावट असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावे यासाठी सुमारे ७० हजार जवान तैनात करण्यात आले आहे.

 

सकाळी अकरा वाजेपर्यंत 13 टक्के मतदानाची नोंद झाली आहे असुन नक्षलवाद्यांच्या दहशतीचा प्रभाव मतदान केंद्रांवर दिसुन येत आहे.

 
पहिल्या टप्प्यातील मतदानात १२ मतदारसंघ जगदलपूर आणि उर्वरीत सहा जागा माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे चर्चेत असलेल्या भागांमध्ये आहे पहिल्या टप्प्यात सुकमा, दंतेवाडा, बीजापुर, जगदपुर, नारायणपुर, कांकेर, कोंडागाव आणि राजनांदगाव जिल्हातील २२ लाखांपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

 

१८ जागांसाठी १४३ उमेदवार रिंगणात असून यात छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमन सिंह आणि त्यांच्या चार मंत्र्यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या विरोधात या वर्षीच्या मे महीण्यात नक्षलवादी हल्यात मरण पावलेल्या उदय मुदलियार यांच्या पत्नी आलका मुदलियार या देखिल मैदात उतरल्या आहेत.

 

मतदानाच्या पूर्वसंध्येला राजनांदगावात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला होता. तर आज मतदानाला सुरुवात होताच कांकोरी जिल्ह्यातही नक्षलींनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.

close