कल्याणमध्ये कारखाण्याला आग

November 11, 2013 12:51 PM0 commentsViews: 19

Image img_89852_manmadankaifire.transfer_240x180.jpg11  नोव्हेंबर : कल्याण पश्चिमेतील बैलबाजार येथे गादीच्या कारखान्यामध्ये भीषण आग लागल्याने संपूर्ण कारखाना आगीत जळून खाक झाला. आगीच्या ज्वाळांनी रौद्ररुप धारण केल्याने कारखान्या लगतची चार घरांमध्येही आगीचे लोण पसरले होते.

 

अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी जागा नसल्याने  स्थानिक रहिवाशांनी जवळच्या घरांवर, तबेल्यांच्या छतावर चढून पाण्याचा मारा केला आणि आग आटोक्यात आणली. पण हे करत असताना  तबेल्याचं छत कोसळलं आणि त्यात 5-6 जण जखमी झाले.

 

जखमींमध्ये कुणीही गंभीर नाही,  अनधिकृत बांधकामं आणि येण्याजाण्यासाठी पुरेसे रस्ते न ठेवल्याने ही आग वाढली आणि पसरली असा आरोप स्थानिक रहिवास्यांनी केला आहे.

close