एंड्युरो स्पर्धेला पुण्यात सुरुवात

February 7, 2009 6:37 PM0 commentsViews: 1

6 फेब्रुवारी, पुणेसाहसी खेळांना प्रोत्साहन देणार्‍या एंड्युरो स्पर्धेला पुण्यात सुरुवात झालीये. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत ट्रेकिंग, सायकलिंग, नेमबाजी, रिव्हर क्रॉसिंग, बोटींग या सारख्या अनेक क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे. देशभरातून 172 टीम यात सहभागी झाल्या आहेत. नॅशनल एज्युकेशन सोसायटीने या स्पर्धाचं आयोजन केलंय.

close