कॅम्पा कोलावर उद्या पडणार हातोडा

November 11, 2013 1:54 PM1 commentViews: 31

cama cola campound11 नोव्हेंबर : मुंबईतील कॅम्पाकोला इमारतीवर अखेर उद्या हातोडा पडणार आहे. ही अनधिकृत इमारत पाडण्याचं काम 12 नोव्हेंबर म्हणजे उद्या सुरु होणार आहे.

कॅम्पा कोला परिसरातील सात इमारतींवरील अनाधिकृत 35 मजल्यांमधील सुमारे 140 घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पालिकेने संबंधित घरांना बजावली होती. याविरोधात इमारतीतल्या रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतलीय. अतिक्रमणविरोधी पथक इमारतीत दाखल होऊ नये, यासाठी रहिवाशी तयारी करत आहेत.

पण, रहिवाशांनी 12 नोव्हेंबरला सरकारी कामात अडथळा आणू नये, अशी नोटीस वरळी पोलिसांनी बजावली आहे. त्यामुळे उद्या पोलीस विरुद्ध रहिवासी असा संघर्ष रंगण्याची चिन्हं दिसतं आहेत.

दरम्यान, कॅम्पाकोलावर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. कॅम्पा कोला इमारत वाचवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आहे. नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून त्यांनी आदेश दिला तर कॅम्पाकोला वाचू शकते, त्यांनी तसा अध्यादेश काढावा असंही मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी सुचवलं आहे.

  • Nitin Kamat

    campa cola buildings var udya hatoda padnar vachun faar vait watle. Sarva bhrashta mandalinchi hi milibhagat ahe tyala garib rahivasi tari kay karnar va nyay milavnya sathi kona kade janar. wah re mera India sau me se ninyanve beimaan…..

close