‘आम आदमी’च्या देणग्यांची चौकशी सुरू

November 11, 2013 1:14 PM0 commentsViews: 18

arvinda kejriwal11 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि निवडणुकीचे वेगवेगळे रंग आता दिसायला सुरुवात झालीये. दिल्लीमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप यांच्यासमोर तगडं आव्हान उभं करणारी आम आदमी पार्टी चौकशीच्या फेर्‍यात अडकली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पक्षामागे केंद्र सरकारने चौकशीचा ससेमिरा लावलाय आणि ही घोषणा खुद्द केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच केली. आम आदमी पार्टीला परदेशातून देणग्या मिळत असल्याच्या तक्रारी आल्याचं शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गेल्याच आठवड्यात शीला दीक्षित यांनीसुध्दा यावर टीका केली होती. पण, कुठल्याही राजकीय पक्षाला अशाप्रकारे परदेशातून देणगी घेता येत नाही, असा कायदा आहे.

त्यामुळे यासंबंधी चौकशी सुरू केल्याचं शिंदे यांनी सांगितलं.पण, हा पैसा परदेशातून आला असला तरी तो परदेशात राहणार्‍या भारतीय व्यक्तींनी दिल्याचा दावा आम आदमी पार्टीने केलाय. या चौकशीचे आम्ही स्वागतच करतो, पण, काँग्रेसनंही आपल्या निवडणूक निधीचा स्रोत सांगावा, असं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिलंय.

close