सन्मान सचिनचा, सचिन तेंडुलकर जिमखाना !

November 11, 2013 8:02 PM0 commentsViews: 49

sachin sanman11 नोव्हेंबर : कांदिवलीतील एमसीए जिमखान्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव देण्यात आलंय. सचिन तेंडुलकरनं गेली चोवीस वर्ष क्रिकेटला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएननं सचिनचा हा सन्मान केलाय.

यावेळी सचिनने सर्वांचे आभार मानले. भाषणाची सुरूवात सचिनने मराठीत केली पण विंडीजचे खेळाडूही उपस्थिती असल्यामुळे सचिनने दिलगिरी व्यक्त करत इंग्रजीत कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत सर्वांनी जे प्रेम दिले त्याबद्दल सचिनने सर्वांचे आभार मानले.

केंद्रीय कृषीमंत्री आणि एमसीएचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते सचिनला सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला. एमसीएचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण भारतीय टीमनंही हजेरी लावली होती.

close