श्रीलंकेची सावध सुरुवात

February 8, 2009 5:41 AM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारी भारत आणि श्रीलंके दरम्यानीच पाचवी आणि शेवटची वन डे थोड्याच वेळापूर्वी सुरू झाली. श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धनेने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतलीय. जयसूर्या आणि दिलशानने 66 रन्सची भागिदारी केल्यानंतर जयसूर्याला पठाणने आऊट केले. त्याने 37 रन्स केले. दरम्यान श्रीलंकेच्या 15 ओव्हरमध्ये 1विकेटवर 88 रन्स झाले. सीरिजमध्ये भारतीय टीम 4-0ने आघाडीवर आहे. त्यामुळे शेवटच्या मॅचमध्ये लक्ष्मीपती बालाजी आणि रविंद्र जाडेजाला संधी देण्याचा कॅप्टन धोणीचा प्रयत्न आहे. सचिन तेंडुलकरला मात्र या मॅचमध्येही विश्रांती देण्यात आली आहे. बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही भारतीय टीमची कामगिरी चांगली होत आहे. याउलट श्रीलंकन टीमला मात्र घरच्याच मैदानावर सूर सापडलेला नाही. मेंडिस आणि मुरलीधरन या प्रमुख बॉलर्सची कामगिरी चांगली होत नसल्यामुळे त्यांच्या समोरच्या समस्या वाढल्या आहेत.

close