मंगळयान मोहिम पुन्हा पूर्वपदावर

November 12, 2013 1:00 PM0 commentsViews: 195

12 नोव्हेंबर : भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयान मोहिमेतील पाचपैकी पहिले चार कक्षाविस्तार सुरळीतपणे  पार केले आहेत.
भारताच्या महत्वाकांक्षी मंगळयानाची कक्षा वाढविण्याच्या चौथ्या टप्प्यात यानाची कक्षा वाढवण्यात इस्त्रोला अपयश आले होते. लिक्वीड इंजिनमध्ये बिघाड झाल्याने, आज पहाटे पुन्हा ही कक्षा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यात यश आल आहे.

 

आता हे यान 1,11,384 किमी पर्यंत पोहोचलाये. पृथ्वीपासून हळूहळू कक्षा वाढवत हा उपग्रह मंगळाकडे जात आहे. त्यामुळे ही मोहिम पुन्हा पूर्वपदावर आली आहे आणि  मंगळ मोहीम १०० टक्के सुरक्षित असल्याचे इस्रोच्या प्रवक्त्याने सांगितले.

 

close