MIDCची पाईपलाईन फुटली

November 12, 2013 6:44 PM0 commentsViews: 16

12 नोव्हेंबर : नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, दिवा, मुंब्रा मीरा भाईंदर, या मोठ्या लोकवस्तीच्या शहरांना पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कल्याणच्या खोणी गावाजवळून जाणारी 1 हजार 762 इंच व्यासाची ही पाईपलाईन आहे. कल्याण कर्जत महामार्गावर सध्या एमएमआरडीएकडून रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी आज 11 वाजण्याच्या सुमाराला हे काम करताना जेसीबीचा धक्का लागून ही पाईपलाईन फुटली. त्यामुळे या शहरांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही.

close