पवारांच्या मर्जीमुळेच चव्हाणांना मुख्यमंत्रीपद -शिवसेना

November 12, 2013 7:04 PM0 commentsViews: 29

sena on cm12 नोव्हेंबर : काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार हे महाराष्ट्राच्या मातीला भार झालाय. हा भार फेकून देण्याची वेळ आलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मर्जीमुळेच पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्रीपद मिळाले आणि ते त्यांची मर्जी असेपर्यंतच त्या पदावर असतील अशी टीका शिवसेनेनं आपल्या मुखपत्र सामनातून मुख्यमंत्र्यांवर केली.

तसंच राष्ट्रवादीच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला का या मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीनं उत्तर दिलेलं नाही असा टोलाही सामनामधून राष्ट्रवादीला लगावण्यात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.

विशेष म्हणजे नारायण राणे यांनी फाईलींच्या प्रकरणावर आपण मुख्यमंत्री काळात असताना पटापट निर्णय घेत होतो असा टोला राणेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. राणेंच्या या भूमिकेचं सामनाच्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आलं. राणेंची भूमिका योग्यच होती अशी पुस्तीही सेनेनं जोडली. तसंच फाईली रोखून धरणे म्हणजे स्वच्छ आणि सक्षम कारभार केला असे होत नाही. राज्य हे मुख्यमंत्री नसून मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले लाल फितशाही चालवत आहे. हे कारकुनी पद्धतीचे राज्य महाराष्ट्राला व जनतेला मन:स्ताप देत आहे आणि याला जबाबदार शरद पवार आहे. पवार आणि चव्हाणांमध्ये आबादुबीचा खेळ सुरू आहे अशी टीकाही सेनेनं केली.

close