ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार

February 8, 2009 8:04 AM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारी ठाणेठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटल मधल्या मृतदेहांच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारी बातमी 5 फेब्रुवारीला आयबीएन लोकमतने दाखवली होती. आता या बातमीची दखल घेतली गेली आहे. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश हॉस्पिटलच्या प्रशासनाला दिले. मृतदेहांची ओळख पटवून ते ताब्यात घ्यायला कोणीही आलं नाही म्हणून ते मृतदेह वर्षभर वाईट अवस्थेत हॉस्पिटल मध्येच पडून होते. पोलीस प्रशासन आणि हॉस्पिटल प्रशासनसुद्धा या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी झटकत होतं. पण आता या नऊ मृतदेहांपैकी पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आणि उरलेल्या चार मृतदेहांवरही लवकरच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच पोलीस कमिशनर आणि सिव्हिल सर्जन यांनाही कारवाईचे आदेश दिले आहेत. आणि याबाबत सोमवारी आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी सांगितलं.

close