सचिनच्या शेवटच्या मॅचवर 800 कोटींचा सट्टा?

November 12, 2013 7:31 PM0 commentsViews: 31

fixing12 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची अखेरच्या कसोटी मॅचसाठी जशी चाहत्यांना उत्सुकता आहे त्याचप्रमाणे या मॅचवर मोठा सट्टा लागण्याचीही शक्यता आहे.

सचिन किती रन्स करणार, किती रन्सवर आऊट होणार, शतक करणार की नाही यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. सचिनच्या या मॅचवर तब्बल 800 कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीचा हा प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलीस सट्टेबाजांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

सट्टेबाजाच्या काळाबाजारात असणार्‍या सट्टेबाजांवर पोलीस टाच ठेवून आहे. सट्टेबाजीशी संबंधित सर्व हालचालींवर बारिक लक्ष ठेवण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याची माहिती क्राईम ब्रांचचे सह आयुक्त हिमांशु रॉय यांनी सांगितलं.

close