छत्तीसगडचा विकास कुठे?-सोनिया गांधी

November 12, 2013 7:18 PM0 commentsViews: 31

12 नोव्हेंबर : छत्तीसगडमधल्या भिलाईमध्ये आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपवर तोफ डागली. केंद्र सरकारनं छत्तीसगडच्या जनतेसाठी मोठे फंड दिले, पण ते लोकांपर्यंत पोचलेच नाहीत असा आरोप सोनियांनी केला.छत्तीसगडमध्ये प्रगती नसल्यानं तरूण चुकीच्या मार्गावर वळले. विकासाचा गाजावाजा करणार्‍या भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे छत्तीसगडचा विकास झालेला नाही भाजप नेमका कुणाचा विकास करत आहे असा सवाल सोनियांनी उपस्थित केलाय. तसंच कॅगच्या अहवालात भाजप सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांकडं बोट दाखवलं गेलं. पण कारवाई झाली का ? छत्तीसगडच्या भाजप सरकार आणि मंत्र्यांवर आरोप झाले, पण त्यांच्यावर कारवाई झाली का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. छत्तीसगडमधले नागरीक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. छत्तीसगडमध्ये विकासाला प्राधान्य दिलं जात नाहीये. आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जातंय, असा आरोपही त्यांनी केलाय. वाढत्या नक्षली कारवायांवरूनही त्यांनी रमणसिंग सरकारवर टीका केली. त्या छत्तीसगडमधल्या काँग्रेस प्रचाराच्या सभेत बोलत होत्या.

close