सरकारला पुन्हा ‘मावळ’ करायचा का? राजू शेट्टी

November 12, 2013 6:21 PM0 commentsViews: 33

12 नोव्हेंबर : उसाला तीन हजार रुपये दर द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलीय. हा प्रश्न सरकारनं दोन दिवसात सोडवावा नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या कराडमध्ये आंदोलन करू असा इशारा संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. सातार्‍याच्या पोलीस अधीक्षकांनी आंदोलनासाठी येणार्‍या वाहनांवरच बंदी घातल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. पोलिसांना परत मावळ घडवायचा आहे का असा सवाल ही राजू शेट्टी यांनी सरकारला विचारलाय. ते इंदापूर येथे ऊस परिषद च्या वेळी पत्रकारांबरोबर बोलत होते.

close