बाळासाहेबांचं स्मारक अजूनही कागदावरच !

November 12, 2013 9:29 PM0 commentsViews: 23

KDMC balasaheb thakarey11 नोव्हेंबर : येत्या 17 नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतीदिन आहे. एक कोटी किंवा गरज पडल्यास त्याहीपेक्षा जास्त पैसे खर्च करून बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने पारित केला होता.

 

पण एक वर्षानंतरही बाळासाहेबांचं हे स्मारक अजूनही कागदावरच आहे. पण आता जसजसा हा स्मृतीदिन जवळ येतोय तसं महापौर कल्याणी पाटील यांनी स्मारकाचा विषय तातडीचा विषय म्हणून येत्या महासभेत आणण्याचा घाट घातला आहे.

 

बेतूरकर पाडा येथील काळा तलावा शेजारी एक एकर जागेवर हे भव्य स्मारक करण्याचा प्रस्ताव आहे. पालिकेतील विरोधक मनसेने शिवसेना या स्मारकाबाबत करत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

 

ठाणे पालिकेसमोर बाळासाहेबांचं पूर्णाकृती पुतळा रखडला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा ठराव मंजूर होऊनही बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या विषयावर आजतागायत त्यावर कोणत्याही प्रकारची तयारी झाली नाहीये याचा निषेध करण्यासाठी शिवसेना ज्येष्ठ नगरसेवकांनी महासभेचा त्याग केला. बाळासाहेबांच्या निधनाला आता वर्ष पूर्ण होणार आहे आता तरी प्रशासनाला जाग येईल का असा आरोप सत्ताधारी सेना नगरसेवकांनी केलाय. पालिकेच्या मुख्यालयसमोर हा पूर्णाकृती पुतळा बांधण्यात येणार होता मात्र अजूनही त्यावर काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

close