निवृत्त न्यायमूर्तींवर लैंगिक शोषणाचा आरोप

November 12, 2013 9:52 PM0 commentsViews: 15

sc judge12 नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायमूर्तींवर लैंगिक छळ केल्याचा आरोप एका वकील तरुणीने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोलकात्याच्या नॅशनल युनिवर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायन्समध्ये लॉ शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने आपल्या ब्लॉगमध्ये हा गंभीर आरोप केलाय.

या आरोपाची गंभीर दखल घेत भारताचे ऍटोर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टाने यात लक्ष घालावं अशी विनंती केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 3 न्यायाधीशांची एक चौकशी समिती स्थापन केलीय. यात जस्टिस आर. एम. लोढा, जस्टिस एच. एल. दत्तू आणि जस्टिस राजनाथ देसाई यांचा समावेश आहे.

या न्यायाधीशांकडे इंटर्नशीप करत असताना त्यांनी छळ केल्याचं संबंधित मुलीचं म्हणणं आहे. किमान 3 मुलींना त्यांनी असाच त्रास दिल्याचंही तिनं ब्लॉगमध्ये लिहिलंय. दिल्लीत गेल्या डिसेंबरमध्ये जो गँगरेप झाला, त्याचा काळात हा प्रकार घडल्याचं तिचं म्हणणं आहे.

या वकील तरुणीनं आपल्या ब्लॉगवर काय लिहिलंय?

“विद्यापीठातल्या माझ्या अखेरच्या वर्षात इंटर्नशीप करत असताना हिवाळ्याच्या सुट्टीत मी पोलीस बॅरिकेड तोडून अतिशय सन्माननीय आणि नुकतेच निवृत्त झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडे गेले होते. त्यांच्याकडेच मी लॉच्या दुसर्‍या वर्षात असताना काम करायचे. माझ्या या परिश्रमाचं बक्षीस काय मिळालं, तर माझ्या आजोबांच्या वयाच्या त्या माणसानं माझा लैंगिक छळ केला. (शारिरीक नाही, पण तो लैंगिक छळच होता) कायदे अतिशय तोकडे असल्याची जाण असतानाही पाच वर्ष कायद्याचा अभ्यास केल्यामुळे कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी कायद्याकडे बघण्याची दृष्टी मला मिळाली आणि म्हणूनच त्या न्यायाधीशांविरोधात कायदेशीर लढा मी दिला नाही, यामुळे मला खूप असहाय्य वाटलं.”

close