भारतासमोर 321रन्सचं आव्हान

February 8, 2009 8:19 AM0 commentsViews: 3

8 फेब्रुवारी कोलंबो वन डेमध्ये श्रीलंकेने भारतासमोर 321रन्सचं आव्हान ठेवलं आहे. 40 व्या ओव्हरमध्येच त्यांनी 250 रन्स केले होते. पण त्यानंतर दोन रनमध्ये त्यांच्या 4 विकेट्स गेल्या. ओपनर दिलशानची सेंच्युरी तीन रन्सनी हुकली. 97 रन्सवर असताना रोहित शर्माच्या एका अप्रतिम थ्रोमुळे तो रनआऊट झाला. पण त्यापूर्वी, कुमार संगकाराबरोबर त्याने दुस-या विकेटसाठी 143 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. संगकाराने 70 बॉलमध्ये 84 रन्स फटकावताना 7 फोर आणि 1 सिक्स मारला. दोघांनी टीमचा रनरेटही कायम सहाच्यावर ठेवला होता. ही जोडी फोडण्यासाठी धोणीने आठ बॉलर वापरून पाहिले. पण एकालाही त्यांनी दाद दिली नाही. संगकारा आऊट झाल्यावर कादंबीनीने दिलशानला चांगली साथ दिली. पण टीमचा स्कोअर 255 रन्स असताना कादंबिनी आऊट झाला. आणि त्यानंतर दिलशान, कपुगेदरा आणि जयवर्धनेही झटपट आऊट झाले. शेवटच्या ओव्हरमध्ये महारूफने फटकेबाजी करत स्कोर 300च्यावर नेला. भारतातर्फे इशांत शर्माने 3 तर युवराजने 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये आठ विकेटवर 320 धावा केल्या.

close