नाशिक : जंगलीबाबाने घातला लाखोंचा गंडा

November 12, 2013 10:54 PM0 commentsViews: 18

12 नोव्हेंबर : नाशिकमध्ये गुप्तधनाच्या आमिषापोटी या जंगलीबाबानं वडगावमधल्या गावकर्‍यांना लाखो रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. विशेष म्हणजे या प्रकारातल्या अघोरी पूजाअर्चेचा मानसिक धक्का बसून गावातल्याच श्रावण कसबे या तरुणाची मानसिक स्थिती बिघडली आहे. उपचारांसाठी श्रावणला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, मात्र त्याच्या वडिलांची तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. आतापर्यंत हरिओम उर्फ काल्या या बाबानं नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी दिलीए. आता जंगलीबाबाही गायब आहे.

close