मोदींनी केली ‘ऐतिहासिक’ गल्लत,बदलला जनसंघाचा इतिहास !

November 12, 2013 11:06 PM0 commentsViews: 26

12 नोव्हेंबर : निवडणूक प्रचार सभेत आक्रमक भूमिका घेऊन राजकीय विरोधकांना घाम फोडणार्‍या नरेंद्र मोदींचा इतिहास किती कच्चा आहे, याची अनेक उदाहरणं गेल्या काही दिवसात पुढे आली आहेत. नुकतीच त्यांनी गुजरातमधले स्वातंत्र्य सैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याऐवजी जनसंघाचे संस्थापक शामा प्रसाद मुखर्जी यांचं नाव घेतलं.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार…ज्यांनी आजवर स्वत:ची विकास पुरूष अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्या नेत्यानं भविष्याची स्वप्न दाखवली. पण गेल्या काही दिवसात विकासाचा हा अजेंडा त्यांच्या भाषणातून गायब झालाय. त्याची जागा घेतलीय इतिहासानं. पण, त्यामुळे या नेत्याच्या अडचणीत वाढच झालीय. मोदींसाठी परिस्थिती अधिकाधिक वाईट होत चाललीय.

पण, जनसंघाच्या संस्थापकांचं निधन 1953मध्ये झालं होतं. तेही लंडनमध्ये नाही तर गुजरातमध्येच. आणि म्हणूनच मोदींनी इतिसाहासाचे दाखले देताना आजपर्यंत ज्या काही चुका केल्यायत, त्यातली ही घोडचूक ठरलीय. पण, मोदी चुकून बोलून गेल्याचं त्यांचे समर्थक सांगतात.

नेहरु सरदार पटेलांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले नव्हते, असं वक्तव्य त्यांनी केलं आणि नंतर ते मागे घेतलं. तसंच काहीसं घडलं चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरून..पण, अशा प्रकारे इतिहासाचे खोटे दाखले दिल्यानं मोदींच्याच प्रतिमेला धक्का पोचतोय, एवढं नक्की.

close